आता पुरे झालं घरात बसून
उठ हक्कासाठी कंबर कसून
चूल आणि मुलं त्यातच
गेलं
जीवन नारीच वाया गेलं
या जगाची तू जननी असून
दुःखही सारी तुझ्याच
पदरी
जाळली सदा तू दुज्या
उध्दारी
रातन दिनी सेवेसी असून
मनू विचारी धर्मरुढीने
छळ तुझा केला या
विश्वाने
तोडून कडे ये वाघीण बनून
स्त्री मुक्तीचं लेऊन
लेणं
गंगाधराचं गा तू गाणं
या आव्हानाला पेलूया
हसून
कवी गंगाधर पोळ
No comments:
Post a Comment