Total Pageviews

Friday, 3 March 2017

सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठा हाय हो ?




सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो
घाम शेतात आमचा गळं
चोर आयातच घेऊन पळं
धन चोरांचा हा पळण्याचा, फाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
लोणी सारं तिकडं पळं
इथं भुकेनं जीव हा जळं
अहो दुकानवाले दादा आमचा, आटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
न्याय वेशीला टांगा सदा
माल त्याचा की आमचा वदा
करा निवाडा आणा तराजू, काटा कुठं हाय होग्न
सांगा धनाचा साठा...
इथं मिठात शिजते तुरी
तिथं मुर्गी काटा सुरी
सांगा आम्हाला मुर्गी कटलेट, काटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
इथं बिऱ्हाड उघडयावरं
तिथं लुगडी लुगडयावरं
या दुबळीचं धुडकं फडकं, धाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
शोधा सारे साठे चला
आज पाडा वाटे चला
 अहो वामनदादा आमचा घुगरी, घाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
- लोकशाहीर वामनदादा कर्डक

4 comments:

  1. सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो,सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो हेगाने कधी लिहल्या गेले.त्या वेळी परिस्थिती कशी होती.हे गाणे आजही चळवळी ला लढण्याचे बळ आणि प्रेरणा देते.

    ReplyDelete
  2. ह्या गाण्याची चाल कशी आहे?

    ReplyDelete