Total Pageviews

Tuesday, 7 March 2017

डोळं तुमचं डोळं


डोळं तुमचं डोळं, तुमच्या डोळ्यांची मला भीती
खाली बघून चालू किती
माझ्या आईची शिकवण मला
नाही डोळ्या कधी डोळा दिला
तुमचे डोळे प्रश्न पुसतीखाली बघून...
मी कुमारी की श्रीमती
की आहे सौभाग्यवती
मी कुणाच्या मालकीची
तुमचे डोळे प्रश्न पुसतीखाली बघून...
नाव सांगून भागत नाही
तुम्हा हवं आडनावही
 आडनावात ग बाई

साऱ्या लपल्या जाती पातीखाली बघून...

2 comments: