सुंदर ते ध्यान जाई शेतावरी , जाई शेतावरी
औत खांद्यावर घेऊनिया, घेऊनिया ||
कासे पितांबर त्याची खादीची लंगोटी, त्याची खादीची लंगोटी
करण्या नांगरटी निघत असे, निघत असे ||
मकर कुंडले त्याचा घामाच्याच
धारा,त्याचा घामाच्याच धारा
थंडीला उबारा घोंगडीचा,घोंगडीचा ||
तुळशी हार नाही गळा त्याचा
कमरेला विळा,त्याचा कमरेला विळा
माथ्यावर टिळा चिखलाचा, चिखलाचा ||
झोपडीत भुकेलेली त्याची राही
रखुमाई,त्याची राही रखुमाई
कष्टकरी आई अन्नाविना, अन्नाविना ||
आरत्या म्हणती त्याची
भुकेलेली पोरं,त्याची भुकेलेली पोरं
पोटाचे नगारे वाजोनिया, वाजोनिया ||
- पु.ल. देशपांडे
No comments:
Post a Comment