Total Pageviews

Wednesday, 8 March 2017

युगायुगाची गुलामी चाल



युगायुगाची गुलामी चाल, सांभाळीते चुल नी मुल
दास्याचा तुरुंग फोडीत स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते।।

कायानु बायानु कोण्या मनुनं, बंधन घातलं पोथी लिहून
बायांची अक्कल म्हणे गहाण, पुरुषी धाकात सदा रहाणं
स्मृतीची होळी मी करीते, मनुस्मृतीची होळी मी करीते।।

बालपणामदी बापाचं नाव, लगीन झाल्यावर पती हा देव
म्हातारपणामदी पोरांना भ्यावं, असा जीवनी सेवा भाव
बदलाया बंड मी, स्त्री दास्याचा तुरुंग फोडीते।।

कामाला जाताना कमी मजुरी, उशीर झाला तर धनी मुजोरी
गरिबांची आपली ही सदा शिदोरी, जातीपातीची खोल खोल दरी
गुलामी बेड्या मी तोडीते, स्त्री दास्याचा तुरुंख फोडीते।।


No comments:

Post a Comment