Total Pageviews

Tuesday, 7 March 2017

बोंबा मारी शेंबडं


 बोंबा मारी शेंबडं रं, बोंबा मारी शेंबडं
धरल याला भूतानं रं, कापू आता कोंबडं
कस गडबडा लोळं होऽऽऽ
काही खात नाही पीत होऽऽऽ
काही बोलं नाही खेळं होऽऽऽ
धरल असलं का भुतान होऽऽऽ
आपण कापू का कोंबड होऽऽऽ
ओवाळून लिंबू भात, घालू भुताला साकडं
नेऊ त्याला भगताकडं रं, उतरू त्याचं भूतं रं, बोंबा मारी...
हिला पोर नाही होतं, होऽऽऽ
पोरग पासं नाही होतं, होऽऽऽ
त्याला नोकरी नाही की रं, होऽऽऽ
हिला नवऱ्यान टाकलं, होऽऽऽ
हिला नवऱ्यानं मारलं, होऽऽऽ
बाबा चमत्कारी फार, बाबा चमत्कारी फार
देई प्रश्नांना उत्तर, देई प्रश्नांना उत्तर
नेऊ त्याला बाबाकडं रं
बाबा करील उपचार, बोंबा मारी...
अरं डागदर आला, होऽऽऽ
म्हणे नाही भूत याला, होऽऽऽ
आहे मनाचाच रोग, होऽऽऽ
आपण करू उपचार, होऽऽऽ
जाऊ विज्ञान वाटेन, होऽऽऽ
शोधू प्रश्नांना उत्तरं, होऽऽऽ
नेऊ नका भगताकडं रं, कापू नका कोंबड

अरं जाऊ नका बाबाकडं रं, आपण करू उपचार, बोंबा मारी...

No comments:

Post a Comment