हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही
दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही
हे खरे की आज त्यांनी, घेतले सारेच ठेके
पण उद्या त्यांच्या चितेवर,
एकही
रडणार नाही
सांगती जे धर्म जाती, बांधती ते रोज भिंती
पण उद्याचा सूर्य
काही, त्यामुळे फसणार नाही
छान झाले, दांभिकांची, पंढरी उद़्ध्वस्त झाली
यापुढे वाचाळ दिंडी एकही निघणार नाही
आजचे अमुचे पराभव, पचवितो आम्ही उद्यास्तव
विजय तो कसला उरावर, जखम जो करणार नाही
हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही
दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही
- सुरेश भट
No comments:
Post a Comment