बुध्द कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले
त्यांनी जनजीवन
फुलविले ग शेजारीण सखये बाई
देवाच्या नावावर, जे करती छूमंतर
ते भरती आपुली घरं ग, शेजारीण सखये बाई
देव अंगातला बडबडं, मान हालवून हात हात
उडं
मागतो बकरं कोंबडं ग, शेजारीण सखये बाई
देव अंगात आल्यावर, दारूगांजा हवा भरपूर
गंडे दोरे खर्च नंतर
ग, शेजारीण सखये बाई
सुखदेवची देतो जीवा, पोरं देतो मागशील तवा
मग नवरा कशाला हवा गं , शेजारीण सखये बाई
देव अंगात वागतो, जर शब्दाला जागतो
का भगत भीक मागतो ग, शेजारीण सखये बाई
उपवासा नवसामुळं, ही बुध्दी मातीला
मिळं
हे कसं तुला ना कळं ग, शेजारीण सखये बाई
शेवटी सांगते ग आता, सोड साऱ्या भाकड कथा
भरडल्या जीवा किती
व्यथा ग, शेजारीण सखये बाई
त्या भीमरायानं दिला, एक जीवनमार्ग भला
पंचशीलच तारील तुला ग, शेजारीण सखये बाई
मनी घेऊनी तू विश्वास, धर विज्ञानाची कास
प्रगतीचा मार्ग तुज
खुला ग, शेजारीण सखये बाई
- शा. लक्ष्मण केदारे
No comments:
Post a Comment