पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी
या मनामनातून बांधूया एक वाट जाणारी
सांधूया तो पूल जोडू प्रीती
त्यावरी
या मनामनातून.......
मी कोण, कोण तू आहे
कोणाला हे कळले आहे
चल विसरु हे मतभेद नको होऊ
अविचारी
या मनामनातून........
हा हिँदू, मुस्लिम तू रे
भेद कसा हा मानव सारे
जातीसवा धर्मापरी ही मानवता
प्यारी
या मनामनातून........
तुफान वादळे भवती
दर्यावरती लाटा येती
मग एकीत रे चालवू ही नाव
तरणारी
या मनामनातून........
-वसंत माने
Khupch sundar
ReplyDeleteलईच भारीच गीत आहे..
ReplyDelete