तोड मर्दा, तोड ही चाकोरी
तोड बाई, तोड ही चाकोरी
तोड तोड तोड तोड, तोड ही चाकोरी
मुक्तीचं गीत म्हणा, रात हाय अंधारी
गावापासून आपल्या शहरापातूर
बायांपासून आपल्या
पोरापातूर
सर्वांना मातीशी इमान
हाय रं
तरी बी चूल का गुमान
हाय रं...
कुणाची शेतं आनं कुणाची भातं
आपण जात्यात तर ते हसत्यात सुपातं
सुपातल जात्यातं जाणार हाय रं
इतिहास खोटं कधी बोलणार न्हाय रं...
सूर्याचा परकास सर्वा समान रं
धरणीच्या पोटातलं पाणी समान रं
फिरणारा वारा सर्वा समान हाय रं
जमीन का सर्वांना समान नाय रं...
दिल्लीच्या वाटला कुपान हाय रं
संसद नावाचं एक दुकान हाय रं
स्वातंत्र्य स्वातंत्र्य कशात हाय रं
रोटी मागल त्याला बंदूक हाय रं...
पिढयानं पिढयांच वझं पाठनी
आजवर गायली आम्ही आसवांची गाणी
सुखाचं गाणं गडया फुलणार हाय रं
रातीत मशाल पेटवायची हाय रं
आजच मशाल पेटवायची हाय रं
आताच
मशाल पेटवायची हाय रं....
- संभाजी भगत
No comments:
Post a Comment