पोटाच्या खळगीसाठी, बांधून बिऱ्हाड पाठी
तांडा चालला, तांडा चालला ...
ह्या दुष्काळी लोकांची
पोथीच कुणी ना वाची
एक दिसाची भाकर भाजी
मुळीच नाही गाठी
तांडा चालला...
धान्याच्या शोधासाठी
पाण्याच्या शोधासाठी
केवळ आपल्या पोटासाठी
मुकादमाच्या पाठी
तांडा चालला ...
ही गाडी ढळली आता ही मूठ
आवळली आता
या गाडीचा गाडीवान हा
लढेल क्रांतीसाठी
तांडा चालला ...
समतेचा वाही वारा, ना पिळवणुकीला थारा
त्या नगरीच्या शोधासाठी, नव्या माणसासाठी
तांडा चालला ...
माणूस नवा घडवावा, हा लोक लढा वाढवावा
एकजुटीचा आवाज आमचा, आभाळ आता गाठी
तांडा चालला ...
No comments:
Post a Comment