कामगारांच्या कष्टाने, नटवलं जगाला
भाकर नाही पोटाला बाई, कपडा नाही नेसायला
शेतकऱ्यांच्या घामानं, जगाला जगवलं
लुटारू मक्तेदारानी बाई,
आजवर
त्यांना फसवलं
कष्टकऱ्यांना फसवुनी, रास धनाची जमवुनी
निवडणुकीला उधळून बाई, बसती सत्ता टिकवुनी
दुप्पट राबाया लावुनी, निम्मी मजुरी देऊनी
केली आमुची धुळदाण बाई,
रगात
आमच जाळुनी
देशाचं भगत म्हणत्यात, लोकाचं रगात पित्यात
मताला पाया पडत्यात
बाई, मोर्चा बघून दडत्यातं
मंदी दुष्काळ सांगत्यातं,
राबणाऱ्या
जनतेला
पुढे करून या निमित्ताला बाई, चटावल
फायद्याला
जनतेचे म्हणे हे
कैवारी, जनता यांची ही न्यारी
बडे जमिनदार
भांडवलदार बाई, मक्तेदार व्यापारी
एवढीच यांची जनता गं, त्यांचीच यांना चिंता
गं
मूठभर जळवा जगवाया बाई,
जाळती
आमची चिता गं
हलकट हे सरकारं, मळकट सारा कारभार
दारूचा करतंय व्यापार
बाई, खेळतय लॉटरी जुगार
घरामध्ये आता बसून गं, रडून नाही भागायचं
देऊन शिव्या सराप बोटं,़ मोडून नाही चालायचं
घरात भांडण काढ़ुनी, फुटकी भांडी फोड़ुनी
तुटकी बोलणी बोलून
बाई, संपणार नाहीत गाऱ्हाणी
भिती मनातली झुगारुनी, उठा बाई पदर खोचुनी
एकजूट आपली उभारुनी बाई,
दाही
दिशा घुमवुनी
ही भांडवलशाही गाडू
गं, लागल रगात सांडू गं
सोसून सारी संकट बाई, नवच राज्य मांडू गं
या राज्यामध्ये असल्या ह्या, भानगडी
सतरा नसती गं
अधिकार मोठा राबणाऱ्यांना,
नफ्याची
जत्रा नसती गं
भिऊन जगायचा गेला काळ, पुकारतो ग झेंडा लाल
खूप सोसल आजवर बाई, उद्याची किरण लालीलाल
- गुलाब नदाफ
No comments:
Post a Comment