काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता,
माझ्या गावाकडं चल माझा दोस्ता।।
तिथं उन्हात उन्हात, तळत्यात माणसं
त्यांच्या घामाचा, भाव हाय सस्ता।।
माझ्या बापाचं बापाचं, हिरवं रान
काळ्या माईनं माईनं, पिकवलं सोनं
आता सुगीत घालत्यात
गस्ता।।
इथं डब्यात, साखर लागते गोडं
तिथं बापाच्या बापाच्या, अंगाला फोडं
भाव ठरतो त्याला ना
पुस्ता।।
जवा दुष्काळ दुष्काळ, घिरट्या घाली
माझ्या बापाच्या गावाला, कुणी ना वाली
गाव असुन झाला तो
फिरस्ता।।
-इंद्रजित भालेराव
No comments:
Post a Comment