बाई मी धरण, धरण, धरण बांधीते
माझं मरण, मरण, मरण कांडीते, न बाई मी धरण...
झुंजमुंजु ग झालं
पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा ग, कोंडा ग कोंडा मी रांधिते,
न
बाई मी धरण...
दिस कासऱ्याला आला
जीव मागे घोटाळला
तान्हं लेकरू, माझं लेकरू, पाटीखाली मी डालते, न बाई मी धरण...
काय सांगू उन्हाच्या झळा
घावाखाली फूटे शिळा
कढ दाटे, कढ दाटे, पायी पाला मी बांधिते, न बाई मी धरण...
पेरापेरात साखर
त्यांचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी
सारं रान धुंडाळीते, न बाई मी धरण...
येल मांडवाला चढे
माझ्या घामाचे ग आळे
माझ्या अंगणी, माझ्या अंगणी,
पांचोळा ग पडे, न बाई मी धरण...
- दया पवार
Can you please post a English / Hindi translation?
ReplyDeleteखुप छान ✍️✍️👍👍👏👏👏👏👌👌👌
ReplyDelete