हाडांची काडं करून काढला खाणीतून कोळसा
खोकून आमचा जीव गेला
नि भरला तुझा खिसा
तवा बदमाशा कळला
नव्हता का धरम आमुचा
हो दादा रं, तवा तू कसं इचारल नाय,
की आमची जात कंची हाय, न् आमचा धरम कंचा हाय
उपाशी पोटी जेव्हा फिरवला तुझा नांगर
भाजून उन्हात काढली
तुझ्या पिकांची रास
तवा बदमाशा कळली
नव्हती का आमची जमात, हो दादा रं...
चिखलातून आम्ही मडक बनवलं,
पाणी
प्यालास
वाहून ढोरं बांधल्या
चपाला, वहाणा घातल्यास
तवा बदमाशा कसा नाही
रं, तू बाटलास, हो दादा रं...
बांधल तुझं घर लावूनी इटेवर इट
करून हमाली
तुझ्यासाठी रं, मोडली आमची पाठ
तवा बदमाशा कळली
नव्हती का आमची जमात, हो दादा रं...
बनवला कागद आम्ही, त्यावर तू धर्मग्रंथ
लिवला
विणली फुलांची परडी
आम्ही अन् देव तूच पुजला
अस्पृश्यांची परडी
वापरून देव नाही बाटला का ? हो दादा रं...
मातीत घाम गाळल्या शिवाय पीकं येत नाही
कष्ट केल्याशिवाय
जगात काहीच मिळत नाही
आमचे कष्ट नि आमच्या
घामाला जात धर्म नाही का ? हो दादा रं...
कळला खोटेपणा आता, तुझं फुटलंया बिंग
उर्मट़ तुझ्या
भेदभावाला लावीन सुरुंग
जात जमात, धर्म, सर्व होतील एकसंघ, तवा दादा रं..
यारं श्रमिका, यारं दलिता, हाती घेऊन हत्यार
अत्याचारा निपट़ून काढण्या
व्हा आता तैय्यार
तेव्हा त्याला खरा
दाखवू की, आमची जात कंची हाय...
No comments:
Post a Comment