Total Pageviews

Monday, 23 January 2017

समतेच्या वाटेनं

समतेच्या वाटेनं, तू खणकावत पैंजण यावं
तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं... ||धृ||

शेतात रानात, जिथं घामानं भिजली धरती
हिरव्या पिकांवरती, जिथं राघू हो डोलती
ऐसी या कष्टाची महती, गान कोकिळा बोलती
त्या सरीसरीतून, घाम-अत्तर लेवून यावं ||१||
तू यावं, तू यावं...

वाडे जातीपातीचे, ज्यात माणसं कोंडली
ऐसे जबरी विष, पिढी पिढी हो पोळली
हाडामासाची माणसं, कशी ना दिसली
वाडे जातीपातीचे, तू तोडत फोडत यावं ||२||
तू यावं, तू यावं...

अन्यायाविरुद्ध, जिथं मुठी हो वळल्या
इवल्याशा या चिमण्या, जिथं घारीशी हो भिडल्या
त्या युद्धभूमीतून, रक्तचंदन लेवून यावं ||३||
तू यावं, तू यावं
बंधन तोडीत यावं...

              - शंतनू कांबळे